• भाजप महिला आघाडीकडून अकोल्यात झंझावाती जनसंपर्क अभियान सुरू.
  • अकोलेकरांच्या स्वाभिमानासाठी आणि मूलभूत सुविधांसाठी भाजप सदैव कटिबद्ध.
  • प्रभाग १०, १३, १७ आणि २० मध्ये सुवासिनीताई धोत्रेंनी मतदारांशी साधला संवाद.

AKOLA | विरोधकांकडे कोणतेही व्हिजन नाही, केवळ गप्पांचा बाजार आहे. भाजपवर टीका करण्यापूर्वी प्रत्येकाने स्वतःकडे पाहावे आणि मगच भाष्य करावे. चांगल्या गोष्टी करण्यासाठी सकारात्मक विचारसरणीची गरज असते आणि ती केवळ भारतीय जनता पक्षामध्येच आहे, असा विश्वास सौभाग्यवती सुवासिनीताई धोत्रे यांनी व्यक्त केला. अकोलेकरांच्या कल्याणासाठी, भावना जपण्यासाठी आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाजप सदैव जनतेच्या सुख-दुःखात सहभागी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजप महिला आघाडीने अकोल्यात जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. प्रभाग १०, १३, १७ आणि २० या प्रभागांमध्ये मतदारांशी संवाद साधताना सुवासिनीताई धोत्रे बोलत होत्या. समाजातील सर्व स्तरांचे पाठबळ भाजपसोबत असून, जनता आणि कार्यकर्त्यांच्या बळावर भारतीय जनता पक्ष निवडणुकीत मोठे यश संपादन करेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या जनसंपर्क अभियानासाठी भाजप महिला आघाडीच्या अर्चनाताई शर्मा, मंजुषाताई सावरकर, चंदाताई शर्मा, चंदाताई ठाकूर यांच्यासह निशा कडी, स्मिता कायंदे, सोनल ठक्कर, रिचा शहा, ऋचा पाटील, अंजलीताई शेळके, सुमनताई गावंडे, गीतांजलीताई शेगोकार, वैशालीताई शेळके, रिता बोरा, पल्लवी पाटील, संध्या जोशी, सुरेखा गावंडे, संजना राखी, निशा ठाकूर आणि सौ. भुसारी यांसारख्या अनेक महिला कार्यकर्त्या जोमाने कामाला लागल्या आहेत.


अमोल जामोदे, प्रतिनिधी, एनटीव्ही न्यूज मराठी, अकोला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *