बाळापूर – माझोड गावाच्या शेतशिवारात काल दि.6 जानेवारी रोजी पुन्हा हा मोठा नीलगाय नर काढण्यास अकोला वनविभाग यशस्वी झाले. मागील आठवड्यात बाळापुर ता. देगाव येथे मोठा नीलगाय नर काढला होता. माझोड येथील तीस फुट खोल विहिरीतील हा मोठा नीलगाय नर खंडारे यांच्या विहिरीत पडला होता. त्यांनी अकोला वनविभागास कळविले आर एफओ विश्वास थोरात, वनपाल गजानन गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार रेस्कुटीमचे वनरक्षक तथा शुटर संघपाल तायडे, मानद वन्यजिव रक्षक बाळ काळणे, चालक यशपाल इंगोले, चालक आलासिंह राठोड, तुषार आवारे , डॉ. प्रविण पवार, प्रदीप खडे हे तत्परतेने घटनास्थळी गेले. तीस फुट खोल विहिरीत पडलेला हा नर तिनशे कि. वर होता . याला संघपाल तायडे यांनी बेहोश केले . रेस्कु टीम सदस्यांनी जाळी व गाडीच्या सहायाने दुपारी 3वाजता प्रयत्न सुरू केले तर 6वाजता नराला बाहेर काढला .
येथील जमलेल्या लोकांनी सांगितले की अनेक वन्यजिव आम्ही सैरावैरा पळत सुटलेले पाहिले त्यांचे आवाजानुसार सावधान झालो हयाच गडबडीत हा नरनीलगाय हया विहिरीत पडला. एरव्ही शेतकरी बांधव वन्यजिवांना कंटाळलेचे सांगतात . मात्र अशा वाचवण्या प्रसंगी ते अंतकरणातून मदत करतात. मानद वन्यजिव रक्षक बाळ काळणे यांचे आवाहन केले की असे कठिण प्रसंग ओढवु नये म्हणून प्रत्येक शेतातील विहिरीवर लोखंडी जाळी बसवावीच .
