श्री.जागेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, वाडेगाव येथे दि. १७.१.२०२६ रोजी वर्ग १२ वी विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ वाडेगाव चे सचिव मा.श्री. डॉ.हिम्मतरावजी घाटोळ साहेब, प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ वाडेगाव चे उपाध्यक्ष मा.श्री. डॉ. वासुदेवरावजी फाळके साहेब, सदस्य शिक्षण प्रसारक मंडळ वाडेगाव चे मा.श्री. विश्वनाथभाऊ मानकर साहेब तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य गोपाल मानकर तसेच उपप्राचार्य अविनाश शिंदे होते सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन तसेच गोविंदराव उपाख्य बापूसाहेब मानकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक संतोष हाडोळे सर यांनी केले जवळजवळ दहा विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केली शिक्षक प्रतिनिधी म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक विजयकुमार दुगड सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य गोपाल मानकर सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले शेवटी अध्यक्षीय भाषणात डॉ. घाटोळ साहेब यांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी त्यांच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अनिता सूर्यवंशी हिने तर आभार प्रदर्शन कु. पातोडे हिने मानले.
