• आ. प्रवीण स्वामींच्या हस्ते विजेत्यांचा गौरव; तालुक्यातील शाळांचा उत्स्फूर्त सहभाग..!

उमरगा प्रतिनिधी | दि. २० जानेवारी

उमरगा (धाराशिव): शिव भारत प्रतिष्ठानच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित भव्य तालुकास्तरीय निबंध स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली. “स्वराज्य निर्मात्या राजमाता जिजाऊ” या विषयावर आधारित या स्पर्धेत उमरगा तालुक्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपल्या लेखणीतून राष्ट्रमातेला अभिवादन केले.

निबंध स्पर्धेचे यशस्वी मानकरी

विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

क्रमांकविजेत्याचे नावशाळा / विद्यालय
प्रथमकु. प्रणवी माधव कांबळेभारत विद्यालय, उमरगा
प्रथमकु. अफिया अजम वस्तादजिल्हा परिषद शाळा, उमरगा
द्वितीयकु. मानवी ज्ञानेश्वर जाधवश्री ज्ञानेश्वर विद्यालय, तुरोरी
द्वितीयकु. केतकी शिवपुत्र कलशेट्टीमहात्मा बसवेश्वर विद्यालय, उमरगा
तृतीयकु. रोहिणी शेखर बिराजदारकै. शरणाप्पा मलंग विद्यालय, उमरगा
तृतीयकु. वैष्णवी सुधाकर माळीशांतेश्वर विद्यालय, सास्तुर

“जिजाऊ म्हणजे जागृती आणि ईश्वरनिष्ठा” – आ. प्रवीण स्वामी

बक्षीस वितरण समारंभाचे उद्घाटक आमदार प्रवीण स्वामी यांनी आपल्या भाषणात राजमाता जिजाऊंच्या कर्तृत्वाचा गौरव केला. ते म्हणाले:

“जिजाबाई या नावातील ‘जि’ म्हणजे जिवंतपणा, ‘जा’ म्हणजे जागृती, ‘बा’ म्हणजे बाणेदारपणा आणि ‘ई’ म्हणजे ईश्वरनिष्ठा! सुमारे ४०० वर्षांपूर्वी परकीय सत्तांच्या अंधकारात ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले, त्या राष्ट्रमाता जिजाऊंच्या विचारांची आजच्या पिढीला गरज आहे.”

सन्मान आणि उपस्थिती

या सोहळ्यात नूतन नगरसेविका सौ. ताराबाई महादेव आप्पा दळगडे, स्वाती किरण स्वामी आणि दीपाली विक्रम बापू बिराजदार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

  • प्रमुख पाहुणे: सौ. शकुंतला मोरे (अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती), शांताबाई चव्हाण, सौ. शिलाबाई मजगे.
  • विशेष उपस्थिती: मुख्याध्यापक पद्माकर मोरे, शिव भारत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर सुरेश मजगे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाचगे सर यांनी केले, तर जिल्हा परिषद प्रशालेच्या सर्व शिक्षक वृंदाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


प्रतिनिधी सचिन बिद्री, उमरगा, धाराशिव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *