प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार, वय ३२ वर्षे, रा. सारोळा ता. जामखेड जि. अहिल्यानगर या प्रस्तावित स्थानबध्द इसमा विरुध्द दत्तवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर व जामखेड पोलीस स्टेशन येथे त्याने वैयक्तीक व साथीदारांच्या मदतीने अग्नौशस्त्रासह सरकारी नोकरास त्याचे शासकीय कामापासून परावृत्त करण्यासाठी जीवे टार मारण्याचा प्रयत्न करणे, अग्नीशस्त्रासह जिल्हादंडाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, व्याजाचो रक्कम वसुल करण्यासाटी अपहरण करन लपवून ठेवणे व दुखापत करणे, घातक शस्त्रासह जबर दुखापत करुन जबरी चोरी करणे, घातक शस्त्रासह महामार्गावर जबरी चोरी करण्यासाठी गंभीर दुखापत करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल असुन त्यास त्या गुन्हयांमध्ये वेळोवेळी अटक करण्यात आल्यानंतर तो न्यायालयातून जामीनावर सुटताच पुन्हा भारतीय दंड विधान, भारतीय न्यायसंहिता, शस्त्र अधिनियम व मुंबई पोलीस फायदश अंतर्गत सराईतपणे गुन्हे करीत होता. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता तो व त्याच्या सोबत असणाऱ्या गुंडा सोबत घातक शस्त्रे सोबत ठेवून लोकांवर दहशत व भिती निर्माण करीत होता. त्यास कायदयाचा अजिबात धाक राहिलेला नव्हता त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बाधा निर्माण होवून लोकांच्या मनात अमुरक्षितेची भावना तयार झाली होती. त्याची दिवसे दिवस वेगवेगळ्या तन्हेने गुन्हे करण्याची प्रवृत्ती बळावत असल्याने सर्व सामान्य लोकांच्या जिवीतास तो उपद्रवी बनला होता त्यामुळे त्याचे विरुध्द महाराष्ट्र झोपडपटटी दादा, हातभट्टीवाले, औषधी विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती य सददृश्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणान्या व्यक्ती (व्हिडीओ पापोटम), तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबत अधिनियम सन १९८१ (१९८१ घा महाराष्ट्राचा ५५ फायदा) ३(३) नुसार धोकादायक व्यक्ती या रांगेत तो मोडत असल्याने त्याचे विरुध्द सदर कारवाई करणे आवश्यक होते. त्यानुसार जामखेड पोलीसांनी मा पोलीस अधिक्षक माो, अहिल्यानगर याचे कडेस प्रस्ताव सादर केला होता सदर प्रस्तावाची पडताळणी करुन पोलोम अधिक्षक साो, अहिल्यानगर यांनी मा जिल्हादंडाधिकारी मागे, अहिल्यानगर यांचे कडेम हद्पार प्रस्ताव पाटीवला होता,
त्यानुसार मा जिल्हाधिकारी सो, अहिल्यानगर यांचे कार्यालयाकडील ग्यानबंध्द आदेश क्र डी.सी/कार्या.९ क १/३२१/२०२५, दिनांक २७.०३.२०२५ अन्यये सदर अधिनियमान्यये प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार, वय ३२ वर्षे, रा.सारोळा ता. जामखेड जि. अहिल्यानगर यास ०१ वर्ष स्थानबध्दतेचे आदेश जारी केला. त्यानुमार श्री सोमनाथ घार्गे, मा. पोलीस अधीक्षक साो, अहिल्यानगर, श्री वैभव करनुबरमे, मा अपर पोलीस अधीक्षक साो, अहिल्यानगर, श्री. प्रविण लोखंडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी मो, कर्जत विभाग, कर्जत, व
श्री. किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, पोलीस उपनिरीक्षक पुष्कर कडू, पो.हे.कॉ. तुकाराम बी. सोनवणे, पोलीस नाईक जितेंद्र सरोदे, पोलीस नाईक रविंद्र वाघ, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शेकडे, पोलीस कॉन्स्टेबल कुलदीप घोळवे, पोलीस कॉन्स्टेबल दतू बेल्हेकर, चालक सहा. फौज. हनुमान आरसुळ सर्व नेमणुक जामखेड पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार रविंद्र पांडे, पो.हे.कॉ. राम माळी यांनी त्यास दिनांक ०९.०२.२०२६ रोजी पुणे येथे ताब्यात घेवून मा. जिल्हादंडाधिकारी साो, अहिल्यानगर यांचे आदेशाप्रमाणे प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार, वय ३२ वर्षे, मध्यवर्ती कारागृह नाशिक या रा. सारोळा ता. जामखेड जि. अहिल्यानगर त्याची दिनांक १०.०२.२०२६ रोजी मध्यवर्ती कारागृह नाशीक येथे रवानगी केली आहे
नंदु परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर
मो नं 9765886124
