मलनिस्सारणच्या कामाच्या चौकशी व कारवाईबाबतचे आंदोलन मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत जामखेड शहरात तब्बल ८० कोटी रुपये खर्च करून होत असलेले जामखेड नगरपरिषद हद्दीतील मलनिस्सारण प्रकल्पाचे काम अत्यंत निकृष्ट, नियमबाह्य व संथगतीने होत आहे. या कामाची तात्काळ चौकशी व कार्यवाही करावी यासाठी काल दि. १० फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जामखेड तहसील कार्यालय समोर सुरू केलेल अमरण उपोषण आंदोलन जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. मात्र दिलेल्या कालावधीत योग्य ती कारवाई व कार्यवाही न केल्यास पुन्हा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनांनी दिला आहे.

गेली एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून शहरात जामखेड महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत ८० मलनिस्सारण प्रकल्पा अंतर्गत सुरू असलेली कामे ही निकृष्ट, अंदाजपत्रक व तांत्रिक निकषांचे उल्लंघन करणारी व संथगतीने सुरू असल्याने शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून, नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण झाला आहे.

सदर प्रकल्पासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र दर्जाहीन, नियमबाह्य व बेफिकीर पद्धतीने कामे सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचाराचा होण्याचा संशय व्यक्त करत योग्य ती चौकशी व कार्यवाही करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हे तिव्र आंदोलन व बेमुदत उपोषण सुरु केले. या अंदोलना दरम्यान मुख्याधिकारी अजय साळवे यांनी आंदोलकांच्या मागण्यांचे इन्स्पेक्शनसह योग्य त्या सर्व प्रकारे कामाची चौकशी करून कामातील त्रुटी दूर केल्याजातील तसेच योग्य ती कारवाई केली जाईल असे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे रात्री थर्डपार्टी उशिरापर्यंत चाललेले अमरण उपोषणाचे हे आंदोलन मागे घेण्यात आले.

दरम्यान आमदार रोहित पवार यांचे पिताश्री राजेंद्र पवार यांनी भेट देऊन आंदोलनाच्या भावना जाणून घेतल्या तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्यांच्याशीही संवाद साधला.

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शहाजी राळेभात, तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य ईस्माईल सय्यद, नगरसेवक राजेंद्र गोरे, वसीम सय्यद, युवक तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात, माजी नगरसेवक विभिषन धनवडे, माजिद कुरेशी, प्रा. कुंडल राळेभात, सागर भोसले, सचिन शिंदे, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष नय्युम सुभेदार, सागर सदाफुले, दादा महाडिक, रमेश आजबे, राजेश चेमटे, प्रवीण माकुडे, संदीप राळेभात, बाबासाहेब मगर, हरिभाऊ आजबे, अरुण डोळस वैजनाथ पोले, मच्छिंद्र जाधव, अनिल अडाले, जमीर शेख, उमेश राळेभात, दीपक कोल्हे, अवधूत पवार, अमोल गिरमे, निखिल घायतडक, संभाजी राळेभात, मंगेश आजबे, बिभिषण धनवडे. प्रवीण उगले, अश्फाक सय्यद, दीपक घायतडक, प्रणव राळेभात, गणेश आजबे, आसिफ शेख, निलेश भोईटे, रहेमान सय्यद, विक्रम जायगुडे, वसीम शेख, इराफ कुरेशी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या

आंदोलनात सहभागी झाले आहेत. अंदोलना दरम्यान आंदोलकांनी नगरपरिषद प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. सकाळी १० वाजता चाललेले हे आंदोलन रात्री ८:०० वाजेपर्यंत चालले.

नंदु परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *