शासनासह कोर्टाच्या निकालाला जवळा ग्रामपंचायत कडुन केराची टोपली

जामखेड तालुक्यातील
जवळा ग्रामपंचायतने राजकीय बळाचा वापर करून खाजगी जागेत अतिक्रमण केले आहे. मला घर बांधू देत नाहीत उलट माझ्या जागेत पाण्याची टाकी बसवून मला अडचण निर्माण केली आहे. शासनाचा आदेश न पाळणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करावी तसेच माझ्या जागेतील अतिक्रमण ३० दिवसांत काढावे अन्यथा मी कुटुंबासह उपोषणाला बसणार आहे, असा इशारा जवळा येथील माजी सैनिक कांतीलाल जगन्नाथ चव्हाण यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

जागा बळकावण्याचा राजकीय डाव ?

▶ माजी सैनिकाची जागा बळकावण्याचा ग्रामसेवकाच्या आडून राजकीय डाव आहे. सदर जागा शासनाने रीतसर फी भरून घेऊन माजी सैनिकास दिली आहे. त्या जागेचा कर रीतसर भरत आहेत. मात्र काही लोकांचा ती जागा बळकावण्याचा प्रयत्न आहे. जाणूनबुजून जागा बदलून देण्याचा घाट घातला जात आहे. मात्र मात्र म माजी सैनिकास दिलेली जागा बदलता येत नाही असा हायकोर्ट, महाराष्ट्र शासन, नाशिक आयुक्त, जिल्हाधिकारी यांचा निकाल आहे. मात्र ग्रामसेवक हायकोर्टाचे आदेश मानत नाही. माजी सैनिकास घरबांधकाम करू देत नाही. ही मनमानी कोणाच्या पाठबळावर करत आहे? कोण राजकीय पुढारी ग्रामसेवकाच्या असून जागा बळकावण्याच्या प्रयत्न करत आहे? माजी सैनिकास अशा पद्धतीची वर्तवणूक मिळत असेल तर सामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

चव्हाण यांनी तहसील कार्यालयास दिलेल्या निवेदनात
म्हटले आहे की जवळा गावात माझ्या मालकिची असलेली जागा मिळकत नं. ५०५ व सिटी सर्वे नं. ६४४ मध्ये ग्रामपंचायतने पाण्याची टाकी बसवली आहे. त्या जागेत मला घर बांधण्यास अडचण निर्माण केली आहे. सदर जागेचा हायकोर्ट, महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी अहिल्यानगर, नाशिक आयुक्त यांचा निकाल माझ्याबाजूने लागला आहे. सर्व आदेशाचे कागदपत्रे आहेत. कोर्टाच्या आदेशाचे ग्रामसेवक यांनी पालन न केल्याने ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा मी ३० दिवसांत पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे कांतीलाल जगन्नाथ चव्हाण यांनी सांगितले.

नंदु परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर
मोनं 9765886124

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *