दिलेल्या निवेदनाची दखल घेत ग्रामदैवत नागेश्वर मंदीर पुलाच्या कामाला नव्याने सुरवात

संबंधीत विभाग लोक प्रतिनिधी व सभापती रामशिंदेचे आभार

सविस्तर वृत्त असे की
जामखेड शहरातील जामखेडचे ग्रामदैवत म्हणुन सर्वशृत ओळख असणाऱ्या ग्रामदैवत नागेश्वर मंदीरालगतच्या छोट्या नदीवर मंदीर आणि शहराला जोडण्यासाठी विद्यमान विधान परिषद सभापती प्रा रामशिंदे यांच्या माध्यमातुन लोखंडी पुल तयार करण्यात आला होता मात्र तो पुल गेल्या काही दिवसा पुर्वी जामखेड परिसरात झालेल्या मुसळधार पावस व वादळ वाऱ्याच्या अस्मानी संकटात वाहुन गेला होता त्यामुळे या परिसरातील पादचारी तथा इतर सोयीस्कर होणारी वाहतुक पुर्ण पणे बंद झाली होती याचा सर्वांना त्रास सहन करावा लागत होता . याच प्रश्नाची जाण ठेवत सामाजिक कार्यकर्त्या तथा दिक्षा सामाजिक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ सुरेखा अनिल सदाफुले यांनी संबंधीत विभागाचे अधिकारी जामखेड तहसिलदार लोक नेते आमदार खासदार यांना या सर्व बाबी दि 30 ऑक्टोबर 2025 रोजी जामखेड येथील तहसीलदार तथा संबंधीताना निवेदनाव्दारे निदर्शनास आणुन दिल्या होत्या त्या नंतर तब्बल पाच महिन्याच्या कालावधी नंतर या सर्व बाबीचा विचार करत विधान परिषद सभापती प्रा रामशिंदे यांच्या प्रयत्नातुन नवीन पुल निर्मितीसाठी भरघोस निधी उपलब्ध करण्यात आला असुन नागेश्वर मंदीर परिसरातील वाहुन गेलेल्या पुलाचे काम पुन्हा नव्याने नगराध्यक्षा सौ चिंतामणी सह मान्यवरांच्या उपस्थित शुभारंभ करून सुरू करण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांच्या मनात कुठेतरी दिलासा व समाधान दिसत आहे मात्र सदर पुलाचे काम नव्याने होत असताना ते अथिक मजबुत करून पुलाची वहातुक क्षमतेची मर्यादा हि वाढती असावी कारण याच पुलामुळे खर्डा परिसरातून येणारी छोटी मोठी वहाने दुचाकी स्वार पादचारी आणि इतर वहातुक करणारे सर्वजण जवळच्या अंतरासाठी याचा वापर करू शकतील तसेच प्रत्येक वर्षी नवरात्र उत्सवा दरम्यान अहिल्यानगर वरुन येणारा तुळजा भवानी देवीचा पलंग जामखेड मध्ये आल्या नंतर पुन्हा तुळजापुर कडे जाताना या मार्गावरून सोयीस्कर रित्या पुन्हा खर्डा शहराकडे जाऊन तुळजापुर कडे मार्गस्थ होऊ शकेल तसेच या परिसरातुन येणाऱ्या सर्व नागरिकांना पोलीस स्टेशन तहसील कार्यालय वा कृषी उत्पन्न बाजार समितीसह इतर सर्व ठिकाणी जाण्यास जवळचा मार्ग म्हणून याचा वापर होऊ शकतो त्यामुळे सर्वच नागरीकांचा अधिक वेळ न जाता विना रहदारी आणि कमी अंतरातून त्यांची सर्व कामे सुलभ होण्यास नक्कीच मदत होणार असल्याचे सौ सुरेखा अनिल सदाफुले यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे तेव्हा संबंधीत विभागाने आता तरी वरील संपूर्ण बाबीचा विचार करून सदरपुल मजबुत व दणकट बनवावा जेने करून पुन्हा पुन्हा याचा खर्च नको असे स्पष्ट करत प्रशासकीय यंत्रणा व विधान परिषद सभापती प्रा रामशिंदे यांचे मनस्वी आभार व्यक्त करत धन्यवाद दिले आहेत .

नंदु परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर
मो नं 9765886124

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *