पोलीसांची कौतुकास्पद कामगीरी
सावरगाव शिवारात चाकूचा धाक दाखवून मारहाण;
गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई
जामखेड तालुक्यातील सावरगाव शिवारात मध्यरात्री ट्रकला दुचाकी आडवी लावून, काच फोडून व चाकूचा धाक दाखवून चालकाला लुटणाऱ्या संशयितांना जामखेड पोलिसांनी अवघ्या १२ तासांत जेरबंद केले आहे. या धडक कारवाईबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३१/०३/२०२६ रोजी रात्री १२.३० च्या सुमारास फिर्यादी ट्रकचालक संतोष बिभीषण फरताडे (रा. सोमनाथ वाडी, जि. बीड) आणि बाळू शामराव तांबे (रा. परांडा, जि. धाराशिव) हे एमएच १४ एलएक्स ९९६९ या ट्रकमधून कोंबड्यांचे खाद्य घेऊन पुण्याहून माजलगावकडे जात होते. जामखेड ते साकत रस्त्यावर
जामखेडपासून ५ किलोमीटर अंतरावर स्पीड ब्रेकरजवळ त्यांनी ट्रकचा वेग कमी केला. त्यावेळी एका स्कूटीस्वाराने ट्रकसमोर स्कूटी आडवी लावून ट्रक थांबवला.
ट्रक थांबल्यानंतर मोटारसायकलवरून आलेल्या इतर तीन जणांनी ट्रकची काच फोडली.
त्यांनी दोघांना मारहाण करत चाकूचा धाक दाखवून खिशातील रोख रक्कम व गाडीतील साहित्य बळजबरीने काढून घेतले. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७५/२०२६, बीएनएस कलम ३०९ (६), ३२४(४), ३(५)
प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा तपास करत असताना घटनास्थळी लपवून ठेवलेली एक मोटारसायकल पोलिसांना आढळून आली. यावरून हा गुन्हा सावरगाव (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथील शुभम सूर्यभान चव्हाण,
शुभम ज्ञानोवा चव्हाण, राम अशोक अडाले आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाने केल्याचे निष्पन्न झाले. संशयितांबाबत खात्रीलायक माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी गुन्हे शोध पथकाला सूचना दिल्या. तांत्रिक माहितीच्या आधारे पथकाने शुभम सूर्यभान
चव्हाण व राम अशोक अडाले यांना सोनेगाव परिसरातून, तर शुभम ज्ञानोबा चव्हाण याला सावरगाव डोंगर परिसरातून ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमें, कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे, पुष्कर कडू, पोलीस नाईक रवींद्र वाघ, देविदास पळसे, कुलदीप घोळवे, आकाश शेवाळे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर बेल्हेकर, भगीरथ देशमाने, दत्तू बेलेकर, ईश्वर माने, होमगार्ड भारत चव्हाण, संदीप चव्हाण, गणेश गायकवाड, दिगंबर औचारे तसेच दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे आणि राहुल गुंडू यांनी केली आहे.
नंदु परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर
मो नं 9765886124
