प्रा. राम शिंदेंच्या पाठपुराव्याला यश; कामाला लवकरच सुरुवात होणार
जामखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात ‘ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उ भारण्यासाठी शासनाने ३१ लाख ९६ हजार ५ रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी या महत्त्वपूर्ण कामासाठी निधी उपलब्ध करून दिला. या निर्णयामुळे शेतीमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुक्कामाचा व मूलभूत सुविधांचा प्रश्न सुटणार आहे.
शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून २७ मार्च २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. नवीन शेतकरी भवन बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून १ कोटी २७लाख ८४ हजार १७ रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली होती. या मंजूर रकमेच्या ५० टक्केप्रमाणे ६३ लाख ९२ हजार ९ रुपये इतके शासन अनुदान या बांधकामासाठी अनुज्ञेय ठरले आहे. या अनुज्ञेय अनुदानाच्या ५० टक्के रक्कम म्हणजेच ३१ लाख ९६ हजार ५ रुपये पहिला टप्पा म्हणून वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. हा उपलब्ध झालेला निधी वितरित करण्यासाठी पुणे येथील राज्याच्या पणन संचालकांना मान्यता देण्यात आली आहे. मंजूर करण्यात आलेला पहिल्या टप्प्यातील हा निधी जामखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आधार संलग्नित बँक खात्यावर पणन संचालनालयामार्फत थेट जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे या भवनाच्या प्रत्यक्ष बांधकामाला आता गती मिळणार आहे.
बाजार समिती आवारात होणारे शेतकरी भवन शेतकऱ्यांसाठी हक्काची इमारत असणार आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत
सभापती प्रा राम शिंदें च्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जामखेडमधील्य हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून, परिसरातील हजारो शेतकरी बांधवांना यातून मोठा दिलासा मिळणार आहे. असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती शरद कार्ले यांनी स्पष्ट करत शिंदे यांना धन्यवाद देत आभार व्यक्त केले
नंदु परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर
मो नं 9765886124
