मंगरुळपीर:-पिण्याचे पाणी हे केवळ गरज नाही तर तो प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे.स्वच्छ पिण्याच्या पाण्यावर सर्वांचा समान अधिकार आहे.हा ऊद्देश समोर ठेवुन वाढदिवस व महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्य ऊन्हातान्हात गरीब गरजु कष्टकरी काम करतात त्यांना प्यायला थंड पाणी मिळावे या ऊद्देशाने सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी गरजूंना माठ वाटप करुन हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.
दान करून सत्कर्म कमवा या उपक्रमाअंतर्गत ही वस्तू भेट म्हणून देण्यात आली.ऊन्हात काम कष्ट करणार्या गरजू बांधवांना माठ (मटके), मिठाई आणि पिण्याचे ग्लास वाटप करण्यात आले.फक्त वस्तू नव्हे, तर थंडावा, आदर आणि माणुसकी देण्याचा हा प्रयत्न होता.त्या थंड पाण्याच्या घोटात फक्त तृप्ती नव्हती, तर आधार, आपुलकी आणि माणुसकीचा स्पर्श होता आणि तोच आनंद प्रत्येक कष्टकर्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.या समाजसेवी कार्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.याआधीही सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी विविध समाजपयोगी उपक्रम राबवले आहेत.

आज समाजाची अवस्था खूप गंभीर झाल्याचे चित्र दिसत आहे. शिक्षण , आरोग्य , भूक , बेरोजगारी , लोकसंख्या , रस्ते, वीज , पाणी आदी अनेक समस्या उग्र रूप धारण करू लागल्या आहेत. विज्ञान तंत्रज्ञानाने खूप प्रगती केल्याचा गवगवात होत आहे. पण मानवाच्या मुलभूत गरजा , समस्या सोडवण्याची पूर्ण जबाबदारी विज्ञान तंत्रज्ञान पार पाडू शकलेले नाही. पाण्यासाठी मानवाचा संघर्ष सुरूच आहे. जगातल्या ज्या ज्या गोष्टी मुलभूत आणि मौल्यवान आहेत या सर्व गोष्टींसाठी मानवाचा संघर्ष सुरु आहे. विज्ञान तंत्रज्ञानाने जग जवळ आल्याचे बोलले जात असले तरी हि माणूस माणसापासून कित्येक योजने दूर गेला हि वस्तुस्थिती आहे.माणूस हा सामाजिक प्राणी आहे असं समाजशास्त्र सांगत. समाजाचे माणसावरती प्रचंड ऋण आहेत. त्यामुळे माणसामध्ये असलेली परोपकाराची वृत्ती लक्षात घेता माणसाने देखील समाजासाठी काहीतरी करने अपेक्षित आहे. हेच सूत्र पकडून सामाजिक जाणीवेच्या भावनेपोटी फुलचंद भगत हे नेहमी सामाजीक कार्यात स्वतःला वाहुन घेवून अनेक समाजपयोगी कार्य करीत असतात.

समाजकार्याचा माझा खारीचा वाटा……
समाजासाठी काहीतरी करावं अशी अनेकांची इच्छा असते पण त्यांच्यातले काहिजन माञ खरोखरच ऊभे राहतात आणी आपल्याला महत्वाच्या वाटणार्या एखाद्या कामासाठी स्वतःला झोकुन देतात.लौकीक अर्थाने त्यांचे काम मोठे नसेलही पण समाज पुढे जाण्याच्या प्रक्रीयेत तो खारीचा वाटा खुप महत्वाचा असतो याच प्रेरणेने मी सुध्दा विविध समाजपयोगी ऊपक्रम राबवत असतो.
- फुलचंद भगत,सामाजिक कार्यकर्ते,मंगरुळपीर
