साल २००२ च्या यादीत पालकाचे नाव असण्याचा पुरावा करावा लागत आहे सादर
बिएलओच्या कामात अधिक शिक्षक गुंतल्याने विद्यार्थ्यांचे होत आहे शैक्षणिक नुकसान

फुलचंद भगत
वाशिम:-विवाहित स्ञियांनी सासरमध्ये मतदारयादीत नाव टाकण्यासाठी मँपिंगसाठी आपल्या माहेरातील साल २००२च्या मतदार यादीत आपल्या वडीलांचे नाव अनुक्रमांक यादी क्रमांक देणे गरजेचे झालेले असुन हा पुरावा सादर केल्यानंतर बिएलओ आपणास संमती म्हणुन मँप केले जाते.यासाठी माहेराहुन बिएलओला साल २००२ चा विधानसभा क्रमांक त्या यादीत आई, वडील, आजी आजोबांचे नाव असने गरजेचे आहे.यादीचा भाग क्रमांक,अनुक्रमांक व ज्या व्यक्तीची माहीती आणली त्याचे नातेसबंधाचा पुरावा बिएलओकडे द्यायचा असुन हे पुरावे सादर करता करता मतदारांची दमछाक होत असुन मंगरुळपीर तालुक्यातील शंभरगावातील शंभरहुन अधिक बिएलओ व मतदांरांची ञेधात्रिपिट होत आहे.
ज्या मतदारांची नावे दोन ठिकाणी आहे त्यांचे नावे एकाच ठिकाणी ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने ही नावे वगळण्यासाठी पुरावा अनेक कागदपत्रांची रेलचेल केल्यामुळे आपले नाव मतदान यादीतून वगळलेल्या जाते की काय या धास्तीने मतदारांची थाकधुक वाढली असून स्त्रियांना जर सासर च्या मतदान यादीत नाव घ्यायचे असेल तर माहेरकडील साल २००२ च्या मतदान यादी त्यांच्या आई-वडिलांचे नाव असलेला पुरावा सासरकडे द्यावा लागत आहे तसेच पुरुष मतदारांचेही काही कारणास्तव दोन् ठिकाणी नावे असल्यास त्यांनाही आपल्या वडिलांचा हाच पुरावा द्यावा लागत आहे मात्र इकडून तिकडे, तिकडून इकडे पुरावे जमा करण्यात मतदारांसह बीएलओ ची दमछाक होत असून कधीकधी इकडचे तिकडचे बीएलओ याद्या देण्यास विलंब करतात तर कधी २००२ यादीत पालकांचे नावच दिसत नाही त्यामुळे ही मोठी समस्या उद्भवत आहे त्यातच मंगरुळपीर तालुक्यातील गावांमध्ये बीएलओची नियुक्ती करण्यात आली असून यात बहुतांश शिक्षकांवर ही जबाबदारी देण्यात आली असल्याने मतदारांना भेटून त्यांची कागदपत्रे जमा करावे लागत असल्याने याचा परिणाम शिक्षणावर होत असून ऐन परीक्षांच्या कालावधीमध्ये हे काम आल्याने विद्याथीचे शैक्षणिक नुकसान होत आहे तर हे काम किती दिवसात आटपायचे आहे याचेही मुदत न दिल्याने बीएलओ वारंवार मतदारांसोबत संपर्क करत असल्याने यालाही मतदार कंटाळले असून अधून मधून अरेरावीची भाषा ही ऐकावी लागत आहे तसेच बीएलओ सोबत काम करण्यासाठी मदतनीस म्हणून आशा केंद्रातील आशा वर्कर या बीएलए म्हणून काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती मात्र ती घोषणाही हवेत विरली आहे. अद्याप पर्यंत कुठेच बीएलए काम करतांना आढळून येत नसल्याने हा गाडा केवळ बीएलओंनाच हाकावा लागत आहे . त्यामुळे शिक्षण देण्याबरोबरच मतदार याद्या तपासणी मतदारांच्या नावात दुरुस्त करणे तसेच डबल मतदार शोधून त्यांची कागदपत्रे जमा करण्याचे काम बीएलओलाच करावी लागत असल्याने त्यांच्या डोईवर मोठा भार पडत असून अनेक ठिकाणी त्यांना आरेरावीची भाषा ही ऐकावी लागत आहे यामुळे त्यांची डोकेदुखी वाढली तथा ते शारीरिक मानसिक तणावात असल्याचे दिसून येत आहे त्यातच कामकाजाच्या व्यापामुळे ही कागदपञे आणुन देण्यासाठी नागरीकांचीही मानसिकता दिसून येत नसल्याचे निदर्शनास येत आहे. म्हणून ही प्रक्रिया सोपी करावी व मतदारांची दोन ठिकाणी नावे आढळून आल्यास तपासणीकांनी आशा मतदारांचे आपल्या स्तरावरच त्याचे एका ठिकाणाचे नाव वगळून टाकावे अशी मागणी मतदार करीत आहे.

शिक्षकांना त्यांच्या मूळ अध्यापन कार्याबरोबरच बीएलओना मॅपिंग चे काम करावे लागत असल्याने त्यांच्या अध्यापनावर मोठा परिणाम होत आहे. दिवसभर शाळेत अध्यापन करून पुन्हा गावोगावी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावे लागते, अनेकदा रात्री उशिरापर्यंत हे काम करावे लागते, त्यामुळे शिक्षकांवर शारीरिक व मानसिक ताण वाढत आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेवर होत असून शिक्षणाचा दर्जा घसरत आहे.शासनाने एसआयआर मॅपिंग साठी एखादी स्वतंत्र यंत्रणा उभी करून शिक्षकांना या कामातून कायमचं कार्य मुक्त करावे.
- एस मांगुळकर,शिक्षक मंगरूळपीर
