फुलचंद भगत
वाशिम:-महापुरुषांच्या जयंतीनिमित्य अनिष्ट प्रथांना फाटा देत गरजु गरीबांना मदतीचा हात देवून समाजपयोगी ऊपक्रम राबवायला हवे.महापुरुषांची जयंती केवळ मिरवणूक किंवा पूजनापुरती मर्यादित न ठेवता, ती रक्तदान, शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण, अन्नदान आणि गरजूंच्या मदतीसारख्या विधायक व समाजपयोगी उपक्रमांनी साजरी करण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून सर्वांना केले जात आहे. अवाजवी खर्च टाळून, महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करणारी सेवाभावी जयंती साजरी केल्यास समाजातील गरजूंना खरा मदतीचा हात मिळेल.शैक्षणिक साहित्याचे वाटप, अनाथालयात अन्नदान, रक्तदान शिबिरे आणि वृक्षारोपणासारखे उपक्रम राबवून जयंती साजरी केली जावी.महापुरुषांच्या विचारांतील उदात्तता आणि समतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात यावा.मिरवणुकीवरील अवाजवी खर्च वाचवून तो गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा.ग्रामीण भागात शालेय साहित्याचे वाटप करुन अनाथ मुलांसाठी अन्नाची सोय करावी.
महापुरुषांनी आपल्या आयुष्यात दीन-दलितांसाठी व मानवतेसाठी कार्य केले. त्यामुळे त्यांची जयंती साजरी करताना त्या विचारांना अनुसरूनच समाजहिताचे काम करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे मत व्यक्त केले आहे.
-ठाणेदार किशोर शेळके,पो.स्टे.मंगरुळपीर
