फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील कवठळ येथील श्री.दामोदर महाराज संस्थानवर दि.१७ एप्रील रोजी महसुल विभागाकडुन आयोजीत छञपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान कार्यक्रम ऊत्साहात संपन्न झाला.यावेळी विविध शासकीय सेवेचे मान्यवर अधिकार्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शी प्रशासन होते, या त्रिसूत्रीची प्रेरणा घेऊन अभियानाला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर असे नाव दिले आहे. या अभियानामुळे येत्या काळात सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात बदल घडविण्यास मदत होणार आहे. आगामी काळातही अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन करावे अशी मागणी होत आहे.मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता या योजनेच्या माध्यमातून येत्या ५ वर्षांत सर्व शेतरस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यात येणार आहेत असेही या कार्यक्रमप्रसंगी सांगण्यात आले.या अभियान कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक
रवि काळे उपविभगीय अधिकारी मंगरुळपीर,सुधाकर अनासुने तहसिलदार मंगरुळपीर,रवि राठोड प्रमुख अतिथी
नायब तहसिलदार मंगरुळपीर,रविंद्र ठाकरे भाजपा तालुका अध्यक्ष,राजुभाऊ जाधव माजी जिल्हा परीषद सदस्य,बेबीताई राठोड उपसरपंचा ग्रा.पं. कवठळ,सतीष क्षीरसागर पोलीस पाटील कवठळ व कोठारी,दिक्षा दुबळगुंडे सरपंचा कोठारी
कार्यक्रमाचे अध्यक्ष,सिमाताई गायकवाड सरपंचा ग्राम पंचायत कवठळ यांची ऊपस्थीती होती.यावेळी कवठळ गावातील अडीअडचणी माजी सरपंच चंद्रशेखर भगत यांनी मांडल्या.

कार्यक्रमाचे मार्गदर्शन रवि काळे उपवविभागीय अधिकारी मंगरुळपीर यांच्या हस्ते
प्रमाणपत्रे/शासकीय सेवेचा लाभ वितरण करण्यात आले.ऊत्पन्न प्रमाणपत्र,जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार अनुदान व श्रावन बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतनयोजनेचे मंजुरी पत्राचे वाटप, डिजिटल सातबारा, आठ अ, फेरफाराचे
वितरण, भारतीय निवडणूक आयोगाचे मतदार ओळखञ, बेबी केअर किट आदींचेही वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे संचलन विलास लोंढे ग्राम महसुल अधिकारी चांधई
तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन
कार्यक्रमाचे आयोजक
रवि राठोड नायब तहसिलदार मंगरुळपीर यांनी मानले,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुंदन पांडे मंडळ अधिकारी कवठळ,अमर शिंदे ग्राम महसुल अधिकारी कवठळ व कवठळ मंडळातील सर्व ग्राम महसुल अधिकारी
व महसुल सेवक तहसिल कार्यालय मंगरुळपीर यांनी परिश्रम घेतले.यावेळी मान्यवरांसह गावकर्यांची ऊपस्थीती होती.

