सहा विद्यार्थ्यांना 90% च्या वर गुण

फुलचंद भगत
वाशिम:-स्थानिक मंगरुळपीर येथील वाय सी सिबिएससी इंग्लीश स्कूलचा दहावीचा शैक्षणिक वर्ष 2025–26 च्या सीबीएसई बोर्ड परीक्षेत 100 टक्के निकाल लागला आहे. निकालाची ही उज्ज्वल परंपरा यंदाही कायम राखली आहे. प्रथम आलेल्या शिलोक बाहेती ला 97.6 टक्के, द्वितीय आलेल्या वसिफ कलिम ला 93.8 टक्के तर नंदिनी बियाणी ला 93.6 टक्के,रेवती महाकाळ 92.4 टक्के,तन्मय सावळेला 92.4,आणी श्रेया देशमुख 90.8 टक्के गुण मिळाले आहेत.तब्बल 6 विद्यार्थ्यांनी 90% टक्क्यांपेक्षा अधिक गुण तर 22 विद्यार्थ्यांनी 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.
शाळेच्या 48 विद्यार्थ्यांनी यावर्षी दहावीची सिबिएससी बोर्डची परीक्षा दिली होती. यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रातील शाळांमध्ये उत्कृष्ट कामगिरीची परंपरा मंगरुळपीर येथील वाय सी सिबिएससी इंग्लिश स्कूलने कायम राखली आहे. त्यासाठी संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्वांचेच योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंञी सुभाषराव ठाकरे,संस्था सचिव चंद्रकांत ठाकरे,शाळेचे प्राचार्य डाॅ.संजिव कुमार सिंग यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शिक्षणातून उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी संस्था सदैव कटिबद्ध राहील असा विश्वास संस्थेकडुन व्यक्त केला आहे.मंगरुळपीर येथील वाय सि सिबिएससी इंग्लीश स्कुल ही भविष्यातही अशाच पद्धतीने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शिक्षणातून उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी संस्था कटिबद्ध असणार आहे असे प्राचार्य संजिवकुमार सिंग यांनी सांगितले.केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डानं यावेळी उत्तरपत्रिकांची तपासणी विक्रमी वेळेत पूर्ण करत निकाल दरवर्षीच्या तुलनेत एक महिना अगोदर जाहीर केला आहे.शाळेचा निकाल आणी विद्यार्थ्यांच्या यशामागे संस्था अध्यक्ष,संस्था सचिव,शाळेचे प्राचार्य आणी वकील खान,भूषण ठाकरे,श्रीकांत राऊत,दिपाली भोजने,राम वानखडे,स्नेहा दंडे,अक्षय इंगोले आदी शिक्षकांनी ज्ञानदानासाठी अथक परिश्रम घेतले यासोबतच शाळेचे शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचेही मोलाचे योगदान लाभले.
यंदा मुलांनी मारली बाजी

यंदा मंगरुळपीर येथील वाय सी सीबीएसईच्या दहावीच्या निकालात मुलांनी मुलींना मागं टाकत बाजी मारली आहे. मुलींच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या मुलांची टक्केवारी अधिक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *