फुलचंद भगत
वाशिम:-दि.१८ एप्रील रोजी स्थानिक तहसिल कार्यालयातील सभागृहात खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक पार पडली.मंगरुळपीर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगामाचे नियोजन करतांना पिकांचे क्षेत्र लक्षात घेऊन आवश्यक बी-बियाणे व खतांचा पुरेसा व योग्य साठा उपलब्ध राहील, यासाठी सविस्तर आढावा घेण्यात आला.

पेरणीनंतर बियाणे न उगवण्याच्या तक्रारी अनेकदा प्राप्त होतात. त्या पार्श्वभूमीवर तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांनी तत्परतेने शेतकऱ्यांना मदत करावी, तसेच खत व बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची कोणतीही हेळसांड होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेपासून अनेक शेतकरी e-KYC त्रुटींमुळे वंचित आहेत. संबंधित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर e-KYC पूर्ण करावी. भविष्यात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कृषी कार्यालयातच e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही सूचना करण्यात आल्या.शेतकर्यांच्या विविध योजना पोहचविन्यासाठी प्राधान्याने काम करुन शेतकर्यांची कुठलीही गैरसोय होणार नाही अशा सुचना यावेळी आमदार यांनी दील्या.शेतकर्यांसाठीच्या योजना राबवुन सदैव शेतकर्यासाठी कर्तव्यतत्पर राहन्याची अपेक्षा या कार्यक्रमप्रसंगी कृषी विभागाकडुन व्यक्त करण्यात आली.या सभेला तहसिलदार,वाशिमचे कृषी अधिक्षक,तालुका कृषी अधिकारी,कृषी सहाय्यकासह कर्मचार्यांची ऊपस्थीती होती.

