जिल्हाधिकारी यवतमाळ यांना शपथपत्र दाखल करण्याचे दिले आदेश
वसंतपूर खर्डा येथील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
फुलचंद भगत
वाशिम:-“चिंतामणी स्टोन क्रशर”हे गेल्या अनेक वर्ष्यापासून
अवैध्य रित्या
वसंतापूर खर्डा येथील अनधिकृतरित्या खनिज उत्खनन करीत आहे. सदर उत्खनन होत असलेल्या जमिनी लगत प्रकाश इंगोले तसेच ठाकरे ह्यांची शेत जमीन आहे. सदरचे उत्खनन हे अनधिकृतरित्या होत असल्या मुळे आजूबाजूच्या शेतजमिनीवर विपरीत परिणाम होऊन पिकांच्या उत्पन्ना मध्ये घट होत आहे त्या बाबत सखोल चौकशी होऊन उचित कार्यवाही होण्याकरिता वसंतपूर येथील शेतकरी प्रकाश इंगोले तसेच ठाकरे यांनी तहसीलदार, कलेक्टर तथा कमिशनर अश्या विविध ठिकाणी शासकीय कार्यालयात तक्रारी दिल्या होत्या परंतु कुठलिही ठोस चौकशी चिंतामणी स्टोन क्रशर विरोधात प्रशासनाकडून केली गेली नव्हती त्यामुळे याचिकर्त्यानी मा.ऊच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे रिट याचिका क्र ३०४३/२०२६ प्रशासन व चिंतामणी स्टोन क्रशर विरोधात दाखल केली. सदर याचिका दि १६/०४/२०२६ रोजी मा. न्यायमूर्ती अनिल किलोर व मा. न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या बेंच पुढे सुनावणीकरिता लागली असता मा. न्यायमूर्तीनी प्रशासनाला नोटीस काढून जिल्हा अधिकारी यवतमाळ यांना सदर प्रकरणाबद्दल शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. कौस्तुभ भिसे,अॅड.सागर एडके यांनी कामकाज बघितले.
