भव्य आयोजन: महाराष्ट्र हिंदी भाषी समाज बहुउद्देशीय संस्था आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हँगिंग गार्डनचा पुढाकार.


मोफत शस्त्रक्रिया: तपासणीत पात्र रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार.


आरोग्य सेवा: अवघ्या ३० रुपयांत नेत्र तपासणी आणि सवलतीच्या दरात चष्मे उपलब्ध.


तज्ज्ञ उपचार: अकोल्यातील प्रसिद्ध दम्माणी आय हॉस्पिटलच्या सहकार्याने लाभार्थ्यांवर होणार उपचार.


AKOLA | मूर्तीजापूर शहरात महाराष्ट्र हिंदी भाषी समाज बहुउद्देशीय संस्था आणि विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गोरगरीब रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

हे शिबिर मंगळवार, दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता श्री संत राधे राधे महाराज सत्संग भवन, भक्तीधाम मंदिर, पटवारी कॉलनी, मूर्तीजापूर येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष श्री द्वारकाप्रसाद दुबे राहणार असून, उद्घाटक म्हणून श्री रतनलालजी महाजन आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री सम्राटी शुक्ल उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला श्री अशोककुमार मदनलाल दुबे, श्री अनिल वेदिया, सौ. संध्याताई दुबे, श्री मोहन तिवारी, श्री मनोहर पांडे, श्री पप्पू शुक्ला यांसह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या शिबिरात केवळ ३० रुपये नोंदणी शुल्कात नेत्र तपासणी केली जाईल. तपासणीत पात्र ठरलेल्या रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असून केवळ ३०० रुपये पॅथॉलॉजी शुल्क आकारले जाईल. तसेच गरजू रुग्णांना सवलतीच्या दरात चष्मे देखील उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


अहेम रज़ा, प्रतिनिधी, एनटीव्ही न्यूज मराठी, मूर्तीजपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *