सावनेर तालुकयात कोलार प्रकल्पाचा केलवद व आस्टी कालवा दुरुस्ती कामात गैरप्रकार
लांचलुचपत विभागाने तात्काल चौकसी करावि अशी स्थानिक नागरिकiची मागनी आहे
अंदाजे 64 लाख रुपये कीमतीचे काम या कामात लाखोंचा भ्रष्टाचार झाल्या आरोप (नागरिक)
सम्बंधित अधिकारी यांचा वर कड़क कारवाही करुण ठेकेदार यांना ब्लाक/ काडया यादित टाकावे
जो पर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तो पर्यन्त एकाही रूपयाचे बिले काडू नये (नागरिक)
या केलवद व आस्टी कालव्याचा कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकiनी केली

नागपुर/सावनेर
महाराष्ट्र मद्दे सध्या बीजेपी, शिव सेना, राष्ट्रवादी या तीन पक्षाची सरकार आहे व तसेच बीजेपी सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
नागपुर जिल्हयाचे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुडे, सावनेर विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार आशीष देशमुख यांचे असुन
सावनेर तालुक्यातील कोलार प्रकल्पाच्या आस्टी कालवा व केलवद मुख्य कालव्यावरील फॉल, पुल, गेट व लाइनिंग दुरुस्तीच्या कामात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्ते मंगेश उराडे यांनी केला आहे. या कामांसाठी अंदाजे कीमत 64 लाख रुपये खर्च करण्यात आले असून, प्रत्यक्षात कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची व बोगस झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर उत्तर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या देखरेखीखाली तसेच सावनेर पाटबंधारे उपविभागाच्या नियंत्रणाखाली हे काम करण्यात आले. आस्टी कालव्यावरील केलवद परिसरात तसेच केलवद मुख्य कालव्यालगत काही शेतकऱ्यांच्या शेताजवळ फॉल, पुल, गेट व इतर दुरुस्तीची कामे नुकतीच पूर्ण करण्यात आली आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या कामांमध्ये निकृष्ट दर्जाचे लोखंड, सिमेंट, गिट्टी, रेती तसेच गिट्टीचा डस्ट/चुरा वापरण्यात आला असून, ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सामाजिक कार्यकर्ते मंगेश उराडे यांनी यासंदर्भात सावनेर पाटबंधारे उपविभाग तसेच उत्तर पाटबंधारे विभाग, नागपूर येथे तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले. मात्र, या तक्रारीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
स्थानिक नागरिकांनी शासनाकडे मागणी करताना सांगितले की, “जोपर्यंत संपूर्ण चौकशी होत नाही, तोपर्यंत संबंधित कामांचे एकाही रुपयाचे बिल काढू नये. तसेच दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.”
या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार तसेच सावनेर मतदारसंघाचे आमदार आशीष देशमुख यांच्या कार्यक्षेत्रात हा कथित भ्रष्टाचार झाल्याने नागरिकांमध्ये चक्क नाराजी व्यक्त होत आहे. या विभागा मार्फत सद्दया झाक झुक,लपवा लपवीचे कामें ठेकेदार तरफे सुरु आहे व ते सम्बधित अधिकारी यांचा सांगन्याने ठेकेदार करित आहे लांच लुचपत विभागाने तात्काल चौकसी करावि अशी स्थानिक नागरिकiची मागनी जोर धरित आहे
या प्रकरणी मंगेश उराडे,गोपाल कलम्बे, पिलाजी मदने, प्रफुल कोल्हे, शामराव धुर्वे आणि रामेश्वर उईके यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली असून, तक्रारीची दखल न घेतल्यास नागपूर उत्तर पाटबंधारे विभाग व सावनेर पाटबंधारे उपविभाग कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
