छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील फर्दापूर पोलीस ठाण्याला सोमवार, दि. 01 जून 2026 रोजी नवे, कर्तव्यदक्ष नेतृत्व लाभले.
फर्दापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांची बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदाचा पदभार स.पो.नि. सुधीर मोटे यांनी स्वीकारला. स.पो.नि. प्रफुल्ल साबळे यांनी आपल्या कार्यकाळात गुन्हे प्रतिबंध, कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे आणि जनसामान्यांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करून उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या योगदानाबद्दल परिसरातील नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
कर्तव्यनिष्ठ, निष्ठावंत, तेजस्वी आणि दरारा असले पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे यांनी सोमवारी फर्दापूर पोलीस ठाण्याचा पदभार अधिकृतपणे स्वीकारला.
गुन्हे अन्वेषण, कायदा-सुव्यवस्था राखणे आणि जनसामान्यांशी सुसंवाद या गुणांसाठी ओळख असले स.पो.नि. सुधीर मोटे यांच्या नियुक्तीची परिसरात मोठी चर्चा आहे. त्यांच्या कार्यकाळात फर्दापूर पोलीस ठाण्याची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि जनसुरक्षा अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर स.पो.नि. सुधीर मोटे यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बेधडक महाराष्ट्र, मराठवाडा विभागीय ब्युरो चीफ तथा एन. टीव्ही न्यूज मराठी, सोयगाव छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी आणि महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जब्बार तडवी यांनी फर्दापूर पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे यांचे अभिनंदन करून पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना स.पो.नि. सुधीर मोटे यांनी सर्व नागरिकांना कायदा पाळण्याचे आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “जनतेची सेवा हेच माझे ब्रीद राहील. फर्दापूरला गुन्हेमुक्त आणि सुरक्षित बनवणे हे माझे प्रथम प्राधान्य असेल.”
या सत्कार व शुभेच्छा कार्यक्रमादरम्यान पोलीस ठाण्यातील कर्मचारी, पत्रकार, ग्रामस्थ, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच राजकीय पुढारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
एन.टीव्ही न्यूज मराठी रिपोर्टर जब्बार तडवी
