दिनकर गोरे सोयगावचे नवे प्रभारी पोलीस अधिकारी

छत्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील
सोयगाव पोलिस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी पोलिस अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज बारवाल यांची बदली झाल्याने सोयगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर शिवाजीराव गोरे यांनी दि.०१ सोमवारी सोयगाव पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला. दि.०२ मंगळवारी सायगाव पोलिस ठाण्यात सपोनी दिनकर गोरे यांची भेट घेत सोयगाव तालुका अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांचे स्वागत करीत सत्कार करण्यात आला यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप शिंदे,सचिव संदीप इंगळे, ईश्वर इंगळे आदींसह पोलिस कर्मचारी संदीप सुसर, राजू सोनवणे,गजानन दांडगे, सादिक तडवी, बाम्हणदे,कुणाल जाधव आदींची उपस्थिती होते.

एन.टीव्ही न्यूज मराठी रिपोर्टर जब्बार तडवी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *