निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने स्वागत व सत्कार;

छत्रपती संभाजी नगर

सोयगाव :- सोयगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांची बदली झाल्यानंतर नव्याने नियुक्त झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर शिवाजीराव गोरे यांनी सोमवार,दि.१ रोजी सोयगाव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला.यावेळी मंगळवार, दि.२ जून २०२६ रोजी निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने मराठवाडा अध्यक्ष विजय काळे यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांची भेट घेत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला.
या प्रसंगी सोयगाव शहरातील नगरसेवक रोफ काळू मामा, जरंडी येथील पत्रकार विजय चौधरी,लोकमत समाचारचे पत्रकार शेख सुलेमान,प्रवीण परेराव यांच्यासह पोलीस कर्मचारी संदीप सुसर,
राजू सोनवणे, गजानन दांडगे, सादिक तडवी,बाम्हणदे, समाधान बारी आदी उपस्थित होते.नवीन प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांना अधिक चांगली पोलीस सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
अशी माहिती निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली

एन. टीव्ही न्यूज मराठी रिपोर्टर जब्बार तडवी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *