गंगापूर (प्रतिनिधी – अमोल पारखे)

गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथे २२ वर्षीय तरुणाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत तरुणाचे नाव विशाल भरत मनाळ (वय २२, रा. वाहेगाव, ता. गंगापूर) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशाल यांनी त्यांच्या राहत्या घरालगत असलेल्या गट क्रमांक ३३६ मधील शेतात शेवरीच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २ जून २०२६ रोजी रात्री ११ वाजण्यापूर्वी घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास पोलीस हवालदार विजय पाखरे करीत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे वाहेगाव परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *