वैजापूर तालुक्यातील पालखेड येथे राज्य शासनाच्या सुधारित वाळू धोरणानुसार घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत वाळू वितरण योजनेचा शुभारंभ पालखेड येथे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्या नेतृत्वाखाली व पंचायत समिती सदस्य राहुल पाटील शेळके यांच्या प्रयत्नांतून करण्यात आला.
घरकुल योजनेंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना कमाल पाच ब्रास वाळू कोणतेही रॉयल्टी शुल्क न आकारता उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी स्वतंत्र अर्जाची आवश्यकता नसून ग्रामपंचायतीमार्फत वाळू पास दिला जाणार आहे.
या उपक्रमामुळे घरकुल बांधकामाचा आर्थिक भार कमी होऊन कामांना गती मिळणार असल्याचे आमदार बोरनारे यांनी सांगितले. राहुल पाटील शेळके यांनी लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे नमूद केले.
यावेळी लाभार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.
प्रतिनिधी रमेश नेटके वैजापूर छत्रपती संभाजी नगर
