अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने एकाच दिवशी 11 ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत 11 गुन्हे दाखल करून 44 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तीन पथके तयार करून कारवाई केली.

18 ऑगस्ट रोजी संगमनेर शहर, नेवासा आणि श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. संगमनेर शहरात जुगाराच्या एका कारवाईत 9,940 रुपये आणि दारूच्या तीन कारवायांत 8,130 रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला.

नेवासा येथे दारूच्या एका कारवाईत 5,890 रुपये, तर श्रीरामपूर तालुक्यात जुगाराच्या चार कारवायांत 12,160 रुपये आणि दारूच्या दोन कारवायांत 8,530 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

एकूण 11 गुन्हे दाखल करून 44,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *