गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सारंगखेडा पोलीस ठाण्यात नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. अश्विनी सानप यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. आगामी सण-उत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावेत, यासाठी गावनिहाय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

बैठकीस सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र बागुल, पोलीस उपनिरीक्षक किरण बहारे तसेच सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.

यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. अश्विनी सानप यांनी प्रत्येक गावातील गणेशोत्सवाचे नियोजन, संभाव्य समस्या तसेच कायदा व सुव्यवस्थेबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. आगामी सण-उत्सवांच्या काळात गावागावातील शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि पोलीस पाटील यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी पोलीस पाटील सुखदेव पाटील, गजेंद्र गिरी गोसावी, डॉ. योगेश चौधरी यांच्यासह सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *