नंदुरबारमध्ये गणेशोत्सवादरम्यान सामाजिक एकता आणि बंधुभावाचे उदाहरण पाहायला मिळाले. राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पवन पुत्र मंडळाला भेट देत अध्यक्ष आणि संपूर्ण कार्यकारिणीचा सत्कार केला.

राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष नूर सलीम सिकलीकर यांच्या नेतृत्वाखाली गणपती विसर्जनाच्या प्रसंगी हा उपक्रम राबवण्यात आला.

यावेळी नूर सलीम सिकलीकर यांनी, “सण-उत्सव हे समाजाला जोडण्याचे काम करतात. नंदुरबारमध्ये परस्पर प्रेम, शांतता आणि एकतेची नाळ अधिक मजबूत करणे हा आमचा उद्देश आहे,” असे सांगितले.

या सत्कार समारंभाला राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे वरिष्ठ पदाधिकारी, जिल्हा सचिव, शहराध्यक्ष, शहर उपाध्यक्ष आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत शांतता, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *