भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा पूर्व महिला मोर्चाच्या चिटणीसपदी यावल येथील सौ. मेघा विजय कासार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ. संध्या नरेश महाजन यांनी ही नियुक्ती केली आहे.

सौ. मेघा विजय कासार यांच्या नियुक्तीबद्दल भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, केंद्रीय राज्यमंत्री नामदार रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय सावकारे, रावेर-यावल विधानसभा आमदार अमोल भाऊ जावळे, आमदार नंदकिशोर महाजन आणि जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

तसेच भारतीय जनता पार्टीतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडूनही सौ. मेघा विजय कासार यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *