जळगाव जिल्ह्यातील यावल शहरातील सोनाली विवेकानंद तायडे यांना बेस्ट बिझनेस आणि ब्युटी आर्टिस्ट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. चाळीसगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय अवॉर्ड शोमध्ये त्यांना महाराष्ट्र बिझनेस अँड ब्युटी अवॉर्ड प्रदान करण्यात आला.

यावल शहरातील विरार नगर परिसरातील रहिवासी, गृहिणी आणि श्रद्धा ब्युटी पार्लरच्या संचालिका सौ. सोनाली विवेकानंद तायडे यांना २१ जुलै २०२६ रोजी चाळीसगाव येथे आयोजित राज्यस्तरीय अवॉर्ड शोमध्ये गौरविण्यात आले. या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत असून, नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

हा कार्यक्रम दक्षिण डॉल्फिन डिझायनर या कंपनीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. राज्यभरातून अनेक ब्युटी एक्स्पर्ट्सनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ब्युटी पार्लर संचालिकांना हा अवॉर्ड देण्यात आला.

यावेळी डॉल्फिन डिझायनर कंपनीचे सीईओ नितीश शिवहरे, एमडी प्रियंका साहू आणि रश्मी लोढाया यांची विशेष उपस्थिती होती.

या पुरस्कारामुळे आपल्या कार्यात वेगळीच ऊर्जा निर्माण होईल आणि आणखी प्रेरणा मिळेल, असे सौ. सोनाली विवेकानंद तायडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *