अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यात तीन नागरिकांचा बळी घेणाऱ्या वाघिणीची दहशत निर्माण झाली आहे. वाघिणीचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नवनीत राणा यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे.
मागील वीस दिवसांत या वाघिणीने तीन जणांचा बळी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एका इसमाचा, २७ तारखेला अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात एका शेतकऱ्याचा, तर काल चांदूरबाजार तालुक्यातील एका तरुणीचा या वाघिणीने बळी घेतला.
वाघिणीचा शोध घेण्यासाठी वनविभागाला हेलिकॉप्टर देण्यात यावे आणि वाघिणीला शूट करण्यात यावे, अशी मागणी नवनीत राणा यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली.
दरम्यान, वाघिणीचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर देण्याचे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिल्याची माहिती आहे.
