भिवंडीत सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मिठाईच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढली आहे. मात्र, मिठाईला आकर्षक रंग देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम खाद्यरंगांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याने विक्रेत्यांनी आता कृत्रिम रंगांचा वापर टाळण्यास सुरुवात केली आहे.
तुकाराम मुंढे यांच्या कृत्रिम रंगबंदीच्या निर्णयाचे भिवंडीतील मिठाई विक्रेत्यांनी स्वागत केले आहे. कृत्रिम रंगांऐवजी नैसर्गिक आणि गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थ ग्राहकांना देणे अधिक योग्य असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
या निर्णयामुळे व्यवसायावर कोणताही विपरीत परिणाम झाला नसून, ग्राहकांमध्येही कृत्रिम रंगांबाबत जागरूकता वाढत असल्याचे मिठाई विक्रेत्यांनी सांगितले.
