ठाणे शहरात RTO कडून सहा ठिकाणी भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. रिक्षाचालकांना मराठी भाषा येते की नाही, याची तपासणी या पथकांकडून केली जाणार असून, मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या रिक्षाचालकांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे रेल्वे स्थानक, खोपट, माजिवडा, वागळे, कळवा आणि मुंब्रा या सहा ठिकाणी RTO ची भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांकडून रिक्षाचालकांना मराठी भाषेचे ज्ञान आहे की नाही, याची तपासणी करण्यात येणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या रिक्षाचालकांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ठाण्यातील रिक्षाचालकांमध्ये या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
