यावल तालुक्यातील 63 ग्रामपंचायतींच्या महिला आरक्षणाची सोडत आज फैजपूर येथे काढण्यात आली. यामध्ये तब्बल 32 ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित झाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
फैजपूरचे प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली महिला आरक्षण काढण्यात आले. यावेळी तहसीलदार मोहन मला, नागरिक, रावेरचे तहसीलदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावल तालुक्यातील 63 ग्रामपंचायतींपैकी 32 ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत.
अनुसूचित जाती महिला – 4 गावे:
वनोली, दुसखेडे, न्हावी प्र. यावल, अंजाळे.
अनुसूचित जमाती महिला – 11 गावे:
कोरपावली, म्हैसवाडी, कासवे, शिरसाड, मनवेल, मारुळ, बामणोद, विरोदे, बोरावल खु., चिखली बु., चितोडे.
ना.मा.प्र. (OBC) महिला – 1 गाव:
दहिगांव.
सर्वसाधारण महिला – 16 गावे:
अट्रावल, डोंगर कठोरा, सांगवी बु., बोरखेडा बु., डोणगांव, नावरे, न्हावी प्र. अडावद, वढोदे प्र. यावल, आडगांव, भालोद, चुंचाळे, गिरडगांव, पिंप्री, उंटावद, वढोदे प्र. सावदा, कोळवद.
झालेल्या आरक्षणामुळे तालुक्यातील इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. बहुतांशी गावांमध्ये आधीचे आरक्षण जैसे थे राहिल्याने इच्छुक उमेदवार कामाला लागल्याची माहिती मिळाली आहे.
