• सावखेडा सिममध्ये वडाखाली गणरायाची स्थापना
  • दहिगावात ‘एक गाव एक गणपती’
  • आकाश महाजन दाम्पत्याच्या हस्ते पूजाअर्चा
  • दुष्काळी परिस्थितीत साध्या पद्धतीने उत्सव
  • विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन
  • गावकऱ्यांची गणेशोत्सवाला मोठी उपस्थिती

JALGAON | यावल तालुक्यातील दहिगाव-सावखेडा सिम येथे गणरायाची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. सावखेडा सिम येथे मोठ्या वडाच्या खाली, तर दहिगाव येथे श्री महादेव आणि हनुमान मंदिराच्या आवारात ‘एक गाव एक गणपती’ची स्थापना करण्यात आली.
सावखेडा सिम येथील गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी दिनेश विश्राम पाटील, उपाध्यक्ष विजय पाटील आणि खजिनदार संतोष पाटील यांच्यासह राजेंद्र पाटील, राजू निकम, मुरलीधर पाटील, गणेश पाटील, सुपडू बोमटू पाटील, कमलाकर पाटील, हेमराज पाटील, नथू बंडू पाटील, अकबर तडवी, सुभेदार तडवी, सलीम तडवी, सर लक्ष्मण बडगुजर, जिभाऊ बडगुजर, दादू पाटील, नकुल पाटील आणि हर्षल पाटील यांचा समावेश आहे.
दहिगाव येथे प्रगतशील शेतकरी आकाश महाजन यांनी सपत्नीक पूजाअर्चा करून गणरायाची स्थापना केली. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात ‘एक गाव एक गणपती’ ही परंपरा सुरू झाली असून, दुष्काळी परिस्थिती पाहता यंदाचा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. यावेळी संगीत खुर्चीसह विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी विविध स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

एनटीव्ही न्यूज मराठी | यावल, जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *