यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले. नगराध्यक्षा छाया अतुल पाटील यांच्या हस्ते या आनंद बाजाराचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील आणि ज्योती वाणी उपस्थित होते.
या आनंद बाजारात तब्बल ६५ विद्यार्थ्यांनी विविध पदार्थांचे स्टॉल लावले होते. विद्यार्थ्यांनी उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला.
यावेळी संस्था अध्यक्ष महेश वाणी, मुख्याध्यापक अतुल गर्गे, मुख्याध्यापक सुनील माळी यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
