JALGAON| यावलकरांची सुकन्या कुमारी अनन्या हिने आपल्या असामान्य शैक्षणिक कर्तृत्वाने यावल शहराचा अभिमान उंचावला आहे. महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा येथे उल्लेखनीय यश संपादन केल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अनन्याला दोन सुवर्णपदकांनी गौरविण्यात आले.

यावल येथील कैलास वाशी, डॉक्टर सतीश यावलकर यांची नात कुमारी अनन्याने औषध निर्माण तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात उल्लेखनीय शैक्षणिक यश संपादन करून दोन सुवर्णपदके प्राप्त केली आहेत.
महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा यांच्या ७५ व्या वार्षिक दीक्षान्त समारंभाच्या मंगलप्रसंगी भारताच्या राष्ट्रपती मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अनन्याला ही दोन्ही सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. हा क्षण अनन्याच्या शैक्षणिक आयुष्यातील अविस्मरणीय आणि संपूर्ण कुटुंबासाठी अभिमानाचा ठरला आहे.
या यशामागे कुटुंबीयांचे प्रेम, आशीर्वाद, प्रोत्साहन, संस्कार आणि भक्कम पाठबळ, तसेच गुरुजनांचे अमूल्य योगदान आहे. कु. अनन्या, तिचे आई-वडील, धाकटी बहीण कु. आर्या, संध्या यावलकर, तेजस यावलकर तसेच यावल येथील आप्त मंडळी आणि बडोदा येथील आई-वडील स्मिता व गिरीश कमलाकर सराफ यांच्याकडून तिचे स्वागत करण्यात आले आहे. अनन्याच्या या यशाचे गाव आणि शहरभरातून कौतुक होत आहे.


एनटीव्ही न्यूज मराठी | यावल


#Yawal #Jalgaon #AnanyaYawalkar #GoldMedal #DraupadiMurmu #MaharajaSayajiraoUniversity #EducationNews #MarathiNews #NTVNewsMarathi #BreakingNews #MaharashtraNews #StudentAchievement #GoldMedalist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *