JALGAON|यावल तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेतील पात्र महसूल मंडळांची यादी तातडीने जाहीर करण्याची मागणी करण्यात आली असून, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना २०२५-२६ अंतर्गत केळी पिकासाठी पात्र ठरलेल्या महसूल मंडळांची यादी तातडीने जाहीर करून शेतकऱ्यांना विमा परतावा मिळवून द्यावा, अशी मागणी यावल तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील हजारो केळी उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत विमा उतरवला आहे. विमा संरक्षण कालावधी ३१ जुलै २०२६ रोजी संपला असून, नियमानुसार ४५ दिवसांच्या आत हवामानाच्या ट्रिगरनुसार पात्र महसूल मंडळांची यादी जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप अधिकृत यादी जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम व असंतोष आहे.
यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळांची यादी पुढील ४ ते ५ दिवसांत ऑनलाइन व ऑफलाइन जाहीर करावी, तसेच हवामान केंद्रांवरील तापमान, वाऱ्याचा वेग आणि पर्जन्यमानाची माहिती पारदर्शकपणे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विमा भरपाईसाठी टाळाटाळ किंवा विलंब करणाऱ्या विमा कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास यावल तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. छायाताई अतुल पाटील, तालुका प्रमुख शरद कोळी, माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक अतुल भाऊ पाटील, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, संतोष धोबी, नगरसेवक सागर चौधरी, नगरसेवक पराग सराफ, नगरसेवक वैशाली बारी, कडू पाटील, योगेश पाटील, योगेश चौधरी, सारंग बेहेडे, सुनिल जोशी, आर. के. चौधरी, किशोर माळी आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या निवेदनातील मागणीनुसार ही माहिती देण्यात आली आहे.
वार्ताहर
प्रतिनिधी, यावल
awal #Jalgaon #केळीपीक #पीकविमा #फळपीकविमा #शेतकरी #शेतकरीआंदोलन #JalgaonNews #YawalNews #MaharashtraNews #BreakingNews #NTVNewsMarathi #NTVNews #FarmerNews #KeliPik #CropInsurance
