JALGAON| यावल पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना भारतीय स्टेट बँकेच्या यावल शाखेकडून मोठी आर्थिक मदत मिळाली आहे. पोलीस सॅलरी पॅकेज अंतर्गत कुटुंबीयांना १ कोटी रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला.
यावल पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी विनोद कोळी हे अंकलेश्वर-बुऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावरून जळगावकडून यावल येथे येत असताना किनगाव ते यावलदरम्यान त्यांच्या मोटारसायकलला एका वाहनाने धडक दिली. या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. दिनांक २० एप्रिल रोजी जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
मयत पोलीस कर्मचारी भरत विठ्ठल कोळी यांचे पगार खाते यावल येथील SBI शाखेत होते. या खात्याला विमा संरक्षण असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना विम्याचा लाभ मिळाला.
भारतीय स्टेट बँकेच्या वतीने मयत पोलीस कर्मचारी भरत कोळी यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला. यावेळी मयत व्यक्तीचे वडील विठ्ठल कोळी, पत्नी कोळी यांच्यासह SBI यावल शाखा व्यवस्थापक राधेश्याम मुंगमोळे, केशव चौधरी, दिनेश खडसे, श्रेया नाथ तसेच बँक कर्मचारी आणि पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे उपस्थित होते.
प्रतिनिधी | एनटीव्ही न्यूज मराठी | यावल
#Yawal #Jalgaon #SBI #SBIInsurance #PoliceNews #PoliceSalaryPackage #YawalNews #JalgaonNews #MaharashtraNews #BreakingNews #NTVNewsMarathi #NTVNews #PoliceFamily #InsuranceClaim #NewsUpdate
