यावल येथील शेतकरी खरेदी-विक्री संघात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पूर्वपदी हरिभाऊ विजय पाटील यांची निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेच्या विविध पदांवरील नियुक्त्याही जाहीर करून नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले.
अपंग संस्था यावल तालुक्याच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष प्रतीक पाटील, उपाध्यक्ष रामदास सोपान पाटील, सचिव ललित पाटील, महिला आघाडी शहराध्यक्ष मिनाताई देशमुख यांच्यासह दिव्यांग बांधव आणि सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी संतोष पाटील, नारायण बापू चौधरी, राकेश भाऊ फेगडे, बाळू पाटील, बजरंग बैरागी, रमजान तडवी, चंद्रकांत पाटील, राजेंद्र महाजन, समाधान दिलीप पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष मयुर पाटील, विनायक पाटील, मुख्याध्यापक बी. डी. पाटील, रमेश पाटील, पुंडलिक पाटील, प्रविण सोनवणे, हेमराज प्रभाकर पाटील, गणेश पाटील, अशोक पाटील, सुनील पाटील, नितीन पाटील आणि शशिकांत पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
याप्रसंगी गजानन गुलाब सोनवणे यांची जिल्हा सचिवपदी, प्रदीप वासुदेव पाटील यांची तालुकाध्यक्षपदी, भोपाली सुधाकर चौधरी हिंगोणेकर यांची प्रहार दिव्यांग महिला तालुकाध्यक्षपदी तर मिनाताई जनार्दन देशमुख यांची यावल शहराध्यक्षपदी नियुक्ती करून नियुक्तीपत्रे देण्यात आली.
हरिभाऊ रत्नाबाई विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभासद नोंदणी करण्यात आली. फैजपूर, हिंगोणा, सांगवी, बोरखेडा, डोंगर कठोरा, अट्रावल, आमोदे, बामणोद, रिंधूर, कासवे, मोहराळे, किनगाव, नायगाव, चिंचाळे, चिंचोली, आडगाव, दहिगाव आणि विरावली येथील दिव्यांग बांधवांनी नोंदणी अर्ज भरले. शेवटी प्रतीक वासुदेव पाटील यांनी आभार मानले.
