यावल तालुक्यातील विरावली येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी संजय मोतीराम पाटील यांची, तर व्हाईस चेअरमनपदी दशरथ सखाराम निळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली.
विरावली येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचे उपस्थितांनी स्वागत केले.
यावेळी नवनिर्वाचित चेअरमन संजय मोतीराम पाटील यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत आपली भूमिका मांडली. विविध कार्यकारी संस्था चालवताना आता मोठी कसरत करावी लागत असून, संस्थेच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच संस्थेतील सर्व सभासदांना न्याय मिळेल, अशाच पद्धतीने आपण काम करणार असल्याचे नवनिर्वाचित चेअरमन संजय पाटील यांनी यावेळी सांगितले.
