नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुखपदी सौ. ज्योती शिवाजीराव वरखिंडे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले असून, पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
ज्योती वरखिंडे यांच्या निवडीनंतर शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी नांदेड जिल्हा उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील खतगावकर, युवा सेना जिल्हाप्रमुख नामदेव पाटील थडके, तालुकाप्रमुख व्ही. व्ही. धुमाळे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत देगलूर तालुक्यातील महिलांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणे, महिलांना संघटित करणे तसेच शिवसेना महिला संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रभावी काम व्हावे, अशी अपेक्षा यावेळी पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.
महिलांच्या समस्या, हक्कांचे प्रश्न तसेच स्थानिक आणि सामाजिक विषयांवर संघटितपणे काम करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
