♦️ मानवतमध्ये 16 वर्षीय मुलीचा मृत्यू
♦️ फोटो प्रसारित केल्याचा फिर्यादीत आरोप
♦️ मानसिक त्रास दिल्याचा तरुणावर आरोप
♦️ मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
♦️ गुन्हा क्रमांक 430/2026 अंतर्गत नोंद
♦️ पोउपनि बिक्कड यांच्याकडे पुढील तपास

PARBHANI | परभणी जिल्ह्यातील मानवत शहरात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या मृत्यूची गंभीर घटना समोर आली आहे. मुलीला त्रास देत तिचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप असून, या प्रकरणी धनगर गल्लीतील एका तरुणाविरोधात मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल जयसिंग लेंगुळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या 16 वर्षीय अल्पवयीन बहिणीला आरोपी पवन मुंजाजी माने याने बोलण्यासाठी आग्रह करत त्रास दिल्याचा तसेच तिचे जबरदस्तीने काढलेले छायाचित्र स्नॅपचॅट स्टेटसवर प्रसारित केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे मुलीला मानसिक त्रास झाल्याचे आणि त्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपीने तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात गु.र.नं. 430/2026, कलम 107 भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 9 वाजून 31 मिनिटांनी स्टेशन डायरी क्रमांक 30 अन्वये नोंद घेण्यात आली.
गुन्ह्याची नोंद पो.ह. 869 शेख यांनी केली असून, स.पो.नि. शिंदे यांच्या आदेशाने पुढील तपास पोउपनि बिक्कड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या घटनेमुळे धनगर गल्ली परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

🎤

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *