भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले आहे. मध्यरात्री अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.

भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना अचानक त्रास जाणवू लागल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

रामराव वडकुते हे मूळचे हिंगोली जिल्ह्यातील असून, अवघ्या सात ते आठ महिन्यांपूर्वीच भाजपने त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केली होती. त्यांच्या निधनाने हिंगोलीसह परभणी जिल्ह्यात शोककळा पसरली असून, राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *