♦️ यावल शहरात उत्साहात निघाली प्रभातफेरी
♦️ गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त नागरिकांचा मोठा सहभाग
♦️ सत्य-अहिंसा आणि सद्भावनेचा दिला संदेश
♦️ गांधी टोपी, पांढऱ्या पोशाखात नागरिक सहभागी
♦️ प्रमुख मार्गांवरून प्रभातफेरीचे उत्साहात मार्गक्रमण
♦️ शांतता आणि बंधुभाव जपण्याचे आवाहन

JALGAON | राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त यावल शहरात प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. सत्य, अहिंसा, एकता, बंधुता आणि सद्भावनेचा संदेश देत मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात ही प्रभातफेरी पार पडली.

शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता यावल शहरातील बोरावल गेट येथून प्रभातफेरीला प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत बुरुज चौक येथे प्रभातफेरीचा समारोप करण्यात आला.
प्रभातफेरीत यावल तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत भगवान पाटील, लिलाधर चौधरी, शहराध्यक्ष मो. हकीम मो. याकुब, विलास शेठ तायडे, महिला तालुकाध्यक्ष कल्पना अजय तायडे, अमोल भिरुड, सतीश आबा पाटील, उमर शेठ कच्ची, करीम मेंबर मन्यार, समीर मेंबर, शरीफ शेठ, अशपाक शाह, अकिल सर, गुलाम गौस, नईम भाई, शरद राजपूत, टेनु सोनार, राजू भाऊ बारी, वसीम भाई खान, साकळीचे सुनील पाटील, निमगावचे अभय महाजन, उमेश जावळे, गुडू पिंजरी, रिंकू बरडे, दीपक कोळी, पिरन तडवी, संतोष सुरवाडे, विकास पटाईत, सय्यद असद, सय्यद जावेद, फिरोज भाई यांच्यासह कार्यकर्ते, युवक आणि विविध सामाजिक घटकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
सहभागी नागरिकांनी गांधी टोपी आणि पांढरे कपडे परिधान करून महात्मा गांधी यांच्या सत्य व अहिंसेच्या विचारांचा तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला.
यावेळी सत्य, अहिंसा, एकता आणि सद्भावना या मूल्यांचा अंगीकार करून समाजात शांतता आणि बंधुभाव निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. प्रभातफेरी यशस्वी करण्यासाठी आयोजक, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि प्रशासनाचे सहकार्य लाभले.

एनटीव्ही न्यूज मराठी | यावल, जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *