♦️ जे. टी. महाजन स्कूलमध्ये गांधी जयंती
♦️ गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन
♦️ विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या कार्याची दिली माहिती
♦️ लाल बहादूर शास्त्रींच्या कार्यावरही प्रकाश
♦️ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आयोजनासाठी विशेष सहकार्य
♦️ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न

JALGAON | यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये महात्मा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांना इतिहासातील राजकीय नेते आणि त्यांच्या कार्याविषयी माहिती मिळावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्लिश मीडियमच्या प्राचार्या श्रीमती दिपाली धांडे आणि सेमी माध्यमाच्या प्राचार्या रंजना महाजन उपस्थित होत्या. तसेच पर्यवेक्षिका गौरी भिरुड आणि राजश्री लोखंडे यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी हर्षाली बारी यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली, तर कुंदा नारखेडे यांनी महात्मा गांधी यांच्या कार्याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या पांडव यांनी केले, तर आभार प्रदर्शन गायत्री चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
अशा प्रकारे महात्मा गांधी जयंतीचा कार्यक्रम शाळेत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

एनटीव्ही न्यूज मराठी | यावल, जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *