आष्टी पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई करत एकाच दिवशी चार ठिकाणी छापे टाकले. जुगार अड्ड्यावर कारवाईसह देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले.

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांनी आष्टी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे.

जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे तिरट जुगार खेळणाऱ्या सादिक शब्बीर शेख, बाळू साहेबराव वाघमारे, पंकज रघुनाथ साबळे, बाबासाहेब गंगाराम शिकारे आणि हरिभाऊ श्रीपती अनारसे यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून मोबाईलसह २७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चोभा निमगाव येथील हॉटेल काळेश्वरीतून ५ हजार १०० रुपये, नांदा शिवारातील हॉटेल रानवारातून ११ हजार ५६० रुपये आणि मांडवा येथील विराज किराणा दुकानातून १ हजार २५० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी सुरज सुभाष मुरकुटे, राजेंद्र बापूराव काळे आणि सचिन नवनाथ मुटकुळे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *