सायबर गुन्हेगारांकडून होणाऱ्या फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये आणि ऑनलाइन व्यवहार करताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी केले आहे.
शेवगाव पोलीस ठाण्याच्या वतीने सायबर जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत नागरिकांनी OTP, ATM PIN, CVV, पासवर्ड अथवा बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नये. अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. तसेच बनावट नोकरी, गुंतवणूक, लॉटरी किंवा KYCच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
सायबर फसवणूक झाल्यास तातडीने बँकेशी संपर्क साधून सायबर हेल्पलाइन १९३० वर तक्रार नोंदवावी. नागरिकांची सतर्कता हाच सायबर गुन्ह्यांपासून बचावाचा प्रभावी मार्ग असल्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी सांगितले.
आयाज शेख | एनटीव्ही न्यूज मराठी | शेवगाव
