वसमत येथील श्री सरस्वती निकेतन हायस्कूलच्या इयत्ता ९वीतील कु. श्रावणी बिंगेवार हिने जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष मा. श्री विवेकजी पोतेवार साहेब यांनी श्रावणीचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तिची जिद्द, मेहनत, आत्मविश्वास आणि खेळातील उत्कृष्ट कामगिरीचे उपस्थितांनी कौतुक केले.

कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री मग्गीरवार सर, पर्यवेक्षक मा. श्री ठोके सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

श्रावणीच्या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर पडली असून, इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली आहे. जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर यश मिळते, याचे उत्तम उदाहरण श्रावणीने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले.

नंदु परदेसी | एनटीव्ही न्यूज मराठी | वसमत, हिंगोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *