यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाने अवैध गौण खनिज वाहतुकीविरुद्ध धडक मोहीम राबवत यावल शहरात हडकाई नदीच्या काठी दऱ्याजवळ अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर (MH 19 Z 5770) पकडून तहसील कार्यालयात जमा केला आहे.

तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी किनगाव सलमान तडवी, मंडळ अधिकारी यावल एस. झेड. श्रीनाथ, मंडळ अधिकारी भालोद सुरवाडे, मंडळ अधिकारी बामणोद दीपक गवई, मंडळ अधिकारी सावखेडा सिम शितल पवार, मंडळ अधिकारी साकळी रिद्धी निघोट, तसेच ग्राम महसूल अधिकारी ईश्वर कोळी, वसीम तळवी, मिलिंद कुरकुरे, एन. आर. चौधरी, गजानन पाटील आणि संदीप गोसावी यांच्या पथकाने ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सहा वाजता ही कारवाई केली. चालक-मालक सतीश उत्तमराव चांदगुडे (पाटील) यांचे वाहन जप्त करून पंचनामा करण्यात आला. याप्रसंगी अवैध रेती वाहतूक करणारे सुमारे १०० ते १५० मजूर, मालक आणि एजंट तहसील कार्यालयाभोवती जमा होऊन प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते. महसूल पथकाने अवैध गौण खनिज वाहतूकदारांविरुद्ध मोहीम उघडली असून कारवाई अधिक कडक करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *