जळगाव जिल्ह्यातील यावल बसस्थानकावरून ३५ वर्षीय महिला तिच्या दोन मुलांसह बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून फूस लावत महिला आणि दोन्ही मुलांना पळवून नेल्याची तक्रार यावल पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी चहार्डी, तालुका चोपडा येथील ३५ वर्षीय महिला आपल्या दहा वर्षीय मुलासह आणि सात वर्षीय मुलीसह प्रवासासाठी यावल बसस्थानकावर आली होती.

यावेळी बसस्थानकावरून या महिलेला आणि तिच्या दोन्ही बालकांना अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फूस लावली आणि पळवून नेल्याची तक्रार यावल पोलिसांत देण्यात आली आहे. या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनील पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *